स्वस्तिक आणि नाझी हुक्ड क्रॉस!
भारतीय धार्मिक परंपरांमध्ये स्वस्तिक हे अत्यंत पवित्र असे समजले जाणारे चिन्हं आहे. नवीन वस्तू, वास्तू, सरस्वती - पूजन, लक्ष्मी - पूजन या आणि अशा सर्व मंगल गोष्टींसाठी आपण स्वस्तिक वापरतो. अनेक प्राचीन राजांनी याचा वापर केला आहे, ओडिसा मध्ये खारवेल नावाच्या राजाने उदयगिरी - खंडगिरी इथे असलेल्या लेण्यांमध्ये त्याच्या शिलालेखाची सुरुवात स्वस्तिक वापरून केली आहे.
आजही आपण हिटलरने त्याच्या नाझी पक्षासाठी वापरलेल्या चिन्हाला स्वस्तिक म्हणतो. गुगल, विकिपीडिया अशा सर्व ठिकाणी त्या चिन्हाचा उल्लेख स्वस्तिक म्हणूनच झाला आहे.
नाझी पक्षासाठी वापरल्या गेलेल्या चिन्हाला - हुक्ड क्रॉस असा शब्द वापरला आहे आणि हिटलरने सर्वात प्रथम हे चिन्हं लहान असताना एका चर्च मध्ये बघितले. हुक्ड क्रॉस चा वापर क्रिश्चन धर्मात मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. रोम मधल्या थडग्यावर, बायबल ची चर्चा असलेल्या अनेक ग्रंथांमध्ये याचा वापर केला आहे.
हिटलरचे नाव जसे खराब झाले तसे नाझी संकल्पनेचा उदय हा क्रिश्चन समाजवादातून झाला आहे हे लपविण्यासाठी हुक्ड क्रॉस या चिन्हाला स्वस्तिक या पवित्र हिंदू चिन्हाबरोबर जोडलं. माईन कांफ या हिटलरच्या आत्मचरित्राच्या इंग्लिश भाषांतरात पहिला स्वस्तिक असा उल्लेख मिळतो आणि हे भाषांतर कुणी केले होते?
जेम्स मर्फी नावाच्या क्रिश्चन धर्मप्रसारकाने!
नाझी चिन्हाला स्वस्तिक म्हणून नका आणि कुणाला म्हणू देऊ नका. विकिपीडिया, गूगल translate सगळीकडे ही माहिती update Kara.
एवढं आपण नक्कीच करू शकतो.
याबद्दलची विस्तृत माहिती आणि सर्व संदर्भ खाली दिलेल्या लिंक वर वाचायला मिळतील.
https://swarajyamag.com/ideas/swastika-is-hindu-and-the-hooked-cross-is-nazi-the-rest-is-conspiracy
फोटो १ - खारवेल राजाने शिलालेखाच्या सुरुवातीला वापरलेले स्वस्तिक
फोटो २ - नाझी हुक्ड क्रॉस
No comments:
Post a Comment